and
(लहान मुलांवर लैंगिक संबंध लादणाऱ्या व्यक्तीला उद्देशून…. ) तुला कधी पश्चात्ताप झाला ​का? | Did You Have any Regrets? (Ode to a paedophile)

1 October 2016

Translated from the English to the Marathi by Urmila Pawar

काय विचार करत होतास तू
जेव्हा तुझं आयुष्य संपत आलं
तुझ्या हृदयाच्या अंतिम ठोक्यापर्यंत?
या बद्दल विचार केलास तू
कधीतरी …

काय तू त्या चोरलेल्या क्षणासाठी व्याकुळ झालास
ते शब्द …
जे तुझी इच्छा पुरी करण्यासाठी फुसफुसलास (माझ्या कानात)
आठवतात तुला ते?
कारण मला आठवतात

तुला कधीतरी वाटलं का
की त्या तृष्णेनं तुझ्यावर आक्रमण केलं नसत
आणि तुला बेडी घातली असती
किंवा तुझ्याकडे असं काही पुरेसं नव्हत का
ज्याने भरून काढला असता तुझ्यातला रितेपणा

तुला कधी पश्चात्ताप झाला का?
मला विचार पडतो
मला खंत वाटते
की मला कधीच संधी मिळाली नाही
तुला क्षमा करण्याची
तू या जगातून जाण्यापूर्वी

This entry was posted in 55.1: DALIT INDIGENOUS and tagged , . Bookmark the permalink.

Related Posts:

  • No Related Posts Found

Comments are closed.

Please read Cordite's comments policy before joining the discussion.